अभिनेत्री राणी मुखर्जी ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. राणीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात.



यश राज फिल्मच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर राणी मुखर्जीचे बॉसी लूकमधील फोटो शेअर करण्यात आले आहेत.



फोटोमध्ये राणी ही प्लेन व्हाईट पँट, प्रिंटेड कोट आणि ब्राऊन फ्रेमचा चष्मा अशा लूकमध्ये दिसत आहे.



राणीच्या या बॉसी लूकला नेटकऱ्यांनी पसंती मिळाली.



यश राज फिल्मच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या फोटोला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करुन राणीच्या या लूकचं कौतुक केलं आहे.



राणीच्या विविध लूक्सला तिच्या चाहत्यांची पसंती मिळते.



राणीचा चाहता वर्ग मोठा आहे. राणीनं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं.



राणी सध्या तिच्या मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे या चित्रपटामुळे चर्चेत आहे.



बंटी और बबली, मर्दानी या राणीच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.



मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे हा राणीचा चित्रपट 17 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.