सध्या मालदीवमध्ये सुट्टी घालवणारी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या नव्या ट्रीप फोटोंनी इंटरनेटवर आग लावत आहे. या मालदीव सफरीमध्ये सोनाक्षीला नवे मित्र भेटले आहे. या नव्या मित्रांसोबात्चे फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सोनाक्षीचे नवे मित्र आहेत वेगवेगळ्याप्रकारचे मासे! मालदीवमध्ये सोनाक्षीने स्कूबा डायव्हिंगचा आनंद घेतला. यावेळी तिने पाण्याखालचं सुंदर जग आणि त्यातील अनोख्या गोष्टींची झलक चाहत्यांना देखील दाखवली. सध्या अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत असून, आपल्या ट्रीपचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. सोनाक्षी सिन्हाने आपल्या दमदार अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर आज बॉलिवूडमध्ये एक खास ओळख निर्माण केली आहे.