आपल्या सौंदर्यानं लाखो तरुणांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीची ओळख आहे. मराठमोळ्या प्राजक्ता माळीच्या सौंदर्यावर चाहते चांगलेच घायाळ होतात. प्राजक्ता नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय राहून, आपले फोटो शेअर करून चाहत्यांना अपडेट देत असते. नुकतेच तिने सोशल मीडियावर मल्टीकलर स्लीट गाऊनमधील काही फोटो शेअर केले आहेत. प्राजक्ता माळी या फोटोंमध्ये खूप सुंदर दिसत आहे. अभिनेत्रीचा हा मल्टी कलर गाऊन ‘द बुझी बटन’ यांनी डिझाईन केला आहे. मोकळे केस, हलका मेकअप, हातात नाजूक ब्रेसलेट आणि नेकपीस घालून तिने आपला हा लूक पूर्ण केला आहे.