बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाने नुकतेच तिचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. सोनाक्षी सिन्हा काळ्या ग्लिटर सिंगल स्लीव्ह गाऊनमध्ये खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे. फोटोंमध्ये सोनाक्षी सिन्हा वेगवेगळ्या स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहे. फोटो शेअर करत सोनाक्षी सिन्हाने लिहिले आहे, थोडीशी चमक सर्वकाही चांगले बनवते. सोनाक्षी सिन्हाचा स्मोकी मेक-अप आणि तिचे खुले सरळ केस तिच्यावर खुलून दिसत आहेत. सोनाक्षी लवकरच 'डबल एक्सएल'मध्ये दिसणार आहे. प्रत्येक लूकमध्ये सोनाक्षी तितकीचं ग्लॅमरस आणि सुंदर दिसत आहे. सोनाक्षी सिन्हाचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. सोनाक्षी सिन्हाने आपल्या दमदार अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर आज बॉलिवूडमध्ये एक खास ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावर सोनाक्षी सिन्हाचे लाखो चाहते आहेत