अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांचा भूल भुलैय्या-2 सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. भूल भुलैय्या-2 या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. वळ चार दिवासांमध्ये या चित्रपटानं 60 कोटी पेक्षा जास्त कमाई केली आहे. आता 11 दिवसांमध्ये या चित्रपटानं 128.24 कोटींची कमाई केली आहे. लवकरच हा चित्रपट 150 कोटींचा टप्पा गाठेल असं म्हटलं जात आहे. कार्तिक आणि कियाराचा हा चित्रपट 20 मे रोजी प्रदर्शित झाला होता. भूल भुलैय्या-2 या चित्रपटामधील कियारा आणि कार्तिकच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. चित्रपटानं पहिल्याचं दिवशी म्हणजेच शुक्रवारी 14.11 कोटींची कमाई केली होती. भूल भूलैया-2 मध्ये कार्तिक आर्यनसोबतच तब्बू, कियारा अडवाणी आणि राजपाल यादव यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. 'भूल भुलैया 2' मध्ये कार्तिक आर्यन हा रूह बाबा ही भूमिका साकारली आहे.