उन्हाळ्यात स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी अधिकाधिक फळांचे सेवन करणे गरजेचे आहे. फळं खाल्ल्याने शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण होते. उन्हाळ्यात लिंबूपाण्याचा रस प्यावा. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. पपई पचनासाठी उत्तम मानली जाते. तसेच पपईमुळे वजनही कमी होते. उन्हाळ्यात तुम्ही संत्र्याचे सेवन अवश्य करा. हे लिंबूवर्गीय फळांमध्ये येतात आणि त्यात सर्वाधिक व्हिटॅमिन सी, फायबर असते. एक किवी तुम्हाला 85 मिलीग्राम व्हिटॅमिन सी देते. याशिवाय व्हिटॅमिन के आणि ई देखील किवीमध्ये मुबलक प्रमाणात आढळते. स्ट्रॉबेरी हे हंगामी फळ असल्यामुळे ते कमी प्रमाणात उपलब्ध असले तरी, जर तुम्ही एक कप स्ट्रॉबेरी खाल्ले तर ते तुम्हाला 100 मिलीग्राम व्हिटॅमिन सी मिळते आंब्यामध्ये जवळपास 122 मिलीग्राम व्हिटॅमिन सी असते. याशिवाय आंब्यामध्ये ‘अ’ जीवनसत्त्वही आढळते. जे डोळ्यांसाठी चांगले असते. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.