उन्हाळ्यात सॅलड म्हणून काकडी लोकांना खूप आवडते. काकडीत व्हिटॅमिन के, अँटिऑक्सिडंट्स तसेच दाहक-विरोधी गुणधर्म असतात. अनेक जण रात्री काकडी खातात. पण त्याचवेळी काही लोक रात्रीच्या वेळी ते खाणे टाळतात. रात्रीच्या वेळी काकडी खाणं योग्य की अयोग्य हे जाणून घ्या. रात्री काकडी खाल्ल्याने पोट जड वाटते. त्यामुळे झोपण्याच्या 3 तास आधी रात्रीचे जेवण करण्याचा प्रयत्न करा. रात्री जड अन्न खाल्ल्याने तुमची झोप खराब होऊ शकते. यामुळेच संध्याकाळी 7 नंतर कार्ब्स खाऊ नयेत. काकडी खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका. कारण काकडीत भरपूर पाणी असते त्यामुळे काकडी खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. त्यामुळे पोषकतत्त्वेही कमी होतात. रात्री जेवणाच्या 30 मिनिटांआधी काकडी खा. यामुळे शरीराला अधिक फायदा होईल.