मलायका अरोरा अलीकडेच गौरी खानच्या स्टोअरबाहेर स्पॉट झाली होती. यादरम्यान दोघीही पापाराझींना एकत्र पोज देताना दिसल्या. मलायका अरोराने यावेळी पापाराझींना शुभेच्छा दिल्या. मलायका वाईन कलरचा गाऊन परिधान करून गोरी खानच्या स्टोअरमध्ये गेली होती. मलायकाचा गाऊन उंच स्लिटचा होता, ज्यामध्ये मलायका नेहमीप्रमाणेच हॉट दिसत होती. मलायका अरोरा तिच्या बोल्ड फिगर आणि आनंदी जीवनशैलीसाठी ओळखली जाते. मलायका अरोरा गौरी खानच्या स्टोअरला भेट देण्यासाठी का आली होती याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मलायका 'दिवा योगा' हे योगा केंद्र चालवते.