सोलापूरमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाला आहे. आंदोलकांनी पुणे-सोलापूर महामार्ग रोखला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली आहे. वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या शिवाय अनेक नागरिकदेखील वाहतूक कोंडीत अडकले होते. अनेक मराठा कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचं बघायला मिळत आहे. महामार्गावर टायरची जाळपोळ केली. रस्त्याच्या मधोमध टायर जाळल्याने गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. अग्निशमन दल आणि पोलिसांनी मिळून आग विझवली आहे. वाहतूक जवळपास अर्ध्या तासानंतर सुरु झाली आहे. परिसरात धूराचे लोट पसरल्याचं बघायला मिळत आहे.