या दसरा मेळाव्याला मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित राहिल्याचं चित्र पाहायला मिळतंय.



शिवसेनेत दोन गट पडल्याने आता कार्यकर्ते आपापल्या नेत्यांचं भाषण ऐकण्यासाठी मोठी गर्दी करत आहेत.



आपल्या नेत्याचं भाषण ऐकण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत.



आझाद मैदानावर देखील शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळतेय.



आझाद मैदानावर तब्बल सव्वा लाख कार्यकर्त्यांसाठी खुर्च्यांची सोय करण्यात आली आहे.



शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात गेल्या वर्षीप्रमाणे बाळासाहेबांची खुर्ची मंचावर ठेवण्यात आली आहे.



या दसरा मेळाव्यातून शिवसैनिकांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला जाणार आहे



या दरम्यान शिंदे गटातील काही नेते या व्यासपीठावर भाषण देखील करणार आहेत.



या दसरा मेळाव्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणावर आपला निशाणा साधणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे.



तसेच, या दसरा मेळाव्याला राज्यभरातून शिवसैनिकांचा प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळतोय.