कार्तिकी एकादशीला देवेंद्र फडणवीस की अजित पवार विठ्ठल रखुमाईची पूजा कोण करणार अशा चर्चांना उधाणा आले होते.



अखेर आज या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.



महाराष्ट्राच्या राजकारणामुळे कार्तिकी एकादशीला नेमक्या कोणत्या उपमुख्यमंत्र्यांनी शासकीय पूजेला बोलावयाचे यावर मंदिर समितीच्या बैठकीत चर्चा झाली.



मराठा आरक्षणासाठी सुरु असलेलं आंदोलन आता अधिक तीव्र होत आहे.



त्याचे पडसाद आता राज्यभर उमटू लागले आहेत.



पंढरपुरातही हे आंदोलन अधिक आक्रमक होत आहे.



राज्यात घडणाऱ्या घडामोडींमुळे कार्तिकी एकादशीला विठ्ठल रखुमाईची पूजा कोण करणार अशी शक्यता निर्माण झाली होती.



पण, अखेरीस मराठा समाजाच्या भावना पाहता हा मान कोणत्याच उपमुख्यमंत्र्यांना न देण्याचा निर्णय घेण्यात आल आहे.



मराठा समाजाचा प्रक्षोभ पाहता मंदिर समितीने अखेर हा निर्णय घेतला आहे.



या पूजेचा मान कोणाला मिळणार या विषयी अद्याप काही सांगण्यात आलेले नाही.



Thanks for Reading. UP NEXT

मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे : धीरेंद्र शास्त्री

View next story