बार्शी तालुक्यातील सुर्डी गावाने राष्ट्रीय पातळीवर नाव कमावले आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी राष्ट्रीय जल पुरस्काराची घोषणा केली. बार्शी तालुक्यातील सुर्डी गावाने तिसरा क्रमांक पटकावत जल पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये महाराष्ट्राला विविध श्रेणीत एकूण चार पुरस्कार प्राप्त झाले. त्यामध्ये बार्शीतल्या सुर्डीचाही समावेश आहे. पाणी फाऊंडेशनच्या माध्यामातून केलेल्या कामामुळे गावाच्या पाणी समस्येत अमुलाग्र बदल झाल्याची प्रतिक्रिया सुर्डीकरांनी दिली पाणी व्यवस्थापनाबाबत सुर्डी गावाने केलेले काम हे संपूर्ण जिल्हाला दिशादर्शक ठरले आहे. 2019 साली पाणी फाऊंडेशनच्यावतीने घेण्यात आलेल्या वॉटर कप स्पर्धेत सुर्डी गावाला पहिला पारितोषिक प्राप्त झालं होतं. अभिनेता आमीर खानच्या उपस्थितीत गावाला 75 लाख रुपयांचं पहिलं पारितोषिक मिळालं होतं