देशभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे.



अभिनेत्री स्वरा भास्करला देखील कोरोनाची लागण झाली आहे.

स्वराने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून चाहत्यांना माहिती दिली आहे.



स्वराची पोस्ट (Swara Bhaskar) स्वराने पोस्टमध्ये लिहिले, 'हॅलो कोव्हिड, माझा आरटी-पीसीआर टेस्टचा रिझल्ट पॉझिटिव्ह आला आहे.

पुढे स्वरा म्हणाली : ताप आणि इतर काही लक्षण जाणवल्यानंतर मी कोव्हिड टेस्ट केली.



मी दोन लसी घेतल्या आहेत, त्यामुळे अशा आहे की लवकर सगळं ठिक होईल, सर्वांनी सुरक्षित राहा. '

काही दिवसांपूर्वी अर्जुन कपूर, रिया कपूर, नोरा फतेही, जॉन अब्राहम आणि मृणाल ठाकुर या कलाकारांना देखील काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती.