अमेरिकेतल्या नागरिकांचं जगणं बर्फवृष्टीनं मुश्किल केले आहे. घराबाहेर पडता येत नाही, वीज नाही, आरोग्य सुविधा नाहीत तापमान शून्य अशांच्याही खाली गेले आहे अख्खी अमेरिका गारठून गेली आहे. 14 लाखांपेक्षा अधिक घरातील वीज गायब झाली आहे. तापमान -45 अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहे तुफान बर्फवृष्टीनं सध्या अमेरिका गोठून गेली आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधली अनेक शहरं बर्फानं झाकून गेली आहेत. बर्फाच्या वादळानं लोकांना हाऊस अरेस्ट केलंय. घरांच्या भिंतींवर चार फुटांपर्यंत बर्फ साचला आहे.