सुंदर दिसायची प्रत्येकाचीच इच्छा असते. आपण कोणताही कार्यक्रम किंवा लग्नसमारंभासाठी स्टायलिश दिसण्यासाठी खूप मेहनत घेतो.



स्टायलिश दिसण्यासाठी कोणत्या आऊटफिट सोबत कोणते शूज किंवा सँडल घालायचे याचंही आपण नियोजन करतो. कोणत्या पेहरावावर कोणते शूज उठून दिसतील हे आपण ठरवतो.



बाजारात तसेच ऑनलाईन अनेक प्रकारचे शूज, सँडल आणि चप्पल उपलब्ध असतात. अगदी 100 रुपयांपासून ते लाखो रुपयांपर्यंतचे चप्पल पाहायला मिळतात.



जगात असे काही शूज आहेत, ज्यांची किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसेल. सर्वसाधारण माणूस स्वप्नातही या चप्पलांच्या किंमतीचा विचार करु शकत नाही.



Rita Hayworth Heels : हॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री रीटा हेवर्थने एका अवॉर्ड फंक्शनमध्ये हे महागडे स्टिलेटोस परिधान केले होते. Stuart Weitzman यांनी हे डिझाइन केले होते. याची किंमत 22 कोटी रुपये आहे.



Ruby Slippers : प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर हॅरी विंस्टनचा मुलगा रॉन विंस्टन याने हॉलिवूड चित्रपट ‘द विजार्ड ऑने ओज’च्या 50 वर्ष पूर्ण होण्याच्या कार्यक्रमाला हे स्लिपर्स घातले होते. याची किंमत सुमारे 22 कोटी रुपये होती.



Debbie Wingham High Heels : Debbie Wingham ने डिझाएइन केलेल्या या शूजची किंमत 15.1 मिलियन म्हणजेच सुमारे 110 कोटी रुपये आहे.



Debbie Wingham हे स्टिलेटोस लेदरपासून बनवण्यात आले असून त्यावर 24 कॅरेट सोन्याचा थर लावण्यात आला आहे.



Moon Star Shoes जगातील सर्वात महागडी सँडल आहे. Antonio Vietri ने हे सँडल डिझाइन केले. Moon Star Shoes ची किंमत 19.9 मिलियन डॉलर म्हणजे सुमारे 145 कोटी रुपये आहे.



Diamond Shoes : जाडा दुबई आणि पॅशन ज्वेलर्सने मिळून हे जगातील सर्वात महागड स्टिलेटोस तयार केले आहे. हे तयार करताना सोने आणि हिऱ्यांचा वापर करण्यात आला आहे.



'पॅशन डायमंड शूज'ची किंमत 17 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 124 कोटी रुपये आहे. या शूजमध्ये 15 कॅरेट डी ग्रेड हिरे वापण्यात आले आहेत.