जगात असे काही देश आहेत जिथे भारतीय चलन म्हणजे एक रुपयाची किंमत जास्त आहे.
व्हिएतनाम देशातील सुंदर समुद्रकिनारे, बौद्ध मठ पर्यटकांसाठी आकर्षण आहे. येथील चलनाचे 326 व्हिएतनामी डोंग हे भारताच्या 1 रुपयाएवढं आहे.
झिम्बाब्वे नैसर्गिक सौंदर्य, वन्यजीवनासाठी प्रसिद्ध आहे. येथे तुम्ही व्हाईट रिव्हर राफ्टिंग, बंजी जंपिंग आणि वाइल्डलाइफ सफारी यांसारख्या अनेक साहसी खेळांचा आनंद घेऊ शकता. भारतीय एक रुपयाची किंमत येथील चलन झिम्बाब्वे डॉलरच्या किंमतीत 1.4 झिम्बाब्वे डॉलर आहे.
नेपाळ हा भारताचा शेजारी देश आहे, जो आपल्या संस्कृती, परंपरा आणि निसर्गासाठी ओळखला जातो. येथील चलनाचं नाव नेपाळी रुपया आहे. भारतीय 1 रुपया 1.5 नेपाळी रुपयाच्या किमतीचा आहे.
दक्षिण पूर्व आशियामध्ये असलेल्या लाओस या देशाच्या चलनाचे नाव लाओ किप आहे. 119 लाओ किप भारताच्या 1 रुपयाएवढी आहे.
कंबोडिया हा देश इतिहास, संस्कृती आणि निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. कंबोडियाचं चलन कंबोडियन रिएल आहे, जे 57.2 कंबोडियन रिएल ते 1 भारतीय रुपयाच्या बरोबरीचं आहे.
उत्तम वास्तुकला आणि निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या हंगेरीच्या चलनाचं नाव हंगेरियन फॉरिंट आहे. येथे भारताचा 1 रुपया हा 4 हंगेरियन फॉरिंट इतका आहे.
दक्षिण अमेरिकेच्या उत्तरेकडील किनार्यावर वसलेला व्हेनेझुएला देश नैसर्गिक सौंदर्यासाठी जगप्रसिद्ध आहे. येथील चलनाचे नाव व्हेनेझुएलन बोलिव्हर आहे. येथे 3,477.5 व्हेनेझुएलन बोलिव्हर 1 भारतीय रुपयाच्या बरोबरीचं आहे.