अनेकदा आकाशाकडे पाहिल्यानंतर तुम्ही विमान उडताना पाहिलं असले. यावेळी तुम्हाला विमानाच्या मागे आकाशात एक पांढऱ्या रंगाची रेष नजरेस पडली असेल
आकाशात उडताना विमानाच्या मागे दिसणारी पांढरी रेष ही धूर असल्याचा अनेकांचा समज आहे. तुम्हालाही असेच वाटत असेल, तर हा तुमचा गैरसमज आहे.
अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या रिपोर्टनुसार, विमानाच्या मागे दिसणारी पांढऱ्या रंगाच्या रेषांना कंट्रेल्स (Contrails) म्हणतात. कंट्रेल्स हे एक प्रकारचे ढग असतात.
कंट्रेल्स हे ढग सामान्य ढगांपेक्षा वेगळे असतात. हे ढग फक्त विमान किंवा रॉकेटमुळे तयार होतात.
नासाच्या रिपोर्टनुसार, जेव्हा विमान पृथ्वीपासून 8 किलोमीटर अंतरावर आणि -40 डिग्री सेल्सिअस तापमानात उडत असते,
तेव्हाच हे कंट्रेल्स ढग तयार होतात. रॉकेट किंवा विमानांच्या एग्जॉस्टमधून एरोसॉल्स (Aerosol) बाहेर पडतात.
एरोसॉल्स म्हणजे हवेतील द्रव बिंदू आणि इतर वायूचे सूक्ष्म कण. हवामानातील आर्द्रतेमुळे या एरोसॉल्सचे रुपांतर ढगात होते, यालाच कंट्रेल्स (Contrails) म्हटलं जातं.
तुम्ही पाहिलं असेल की, विमान किंवा रॉकेट काही अंतरापर्यंत गेल्यावर हे कंट्रेल्स गायब होतात. हवेमधील आर्द्रतेमुळे हे कंट्रेल्स तयार होतात.
आकाशातील जोरदार वाऱ्यामुळे कंट्रेल्सही त्यांच्या जागेवरून सरकतात आणि गायब होतात.
सर्वात पहिल्यांदा कंट्रेल्स 1920 साली दुसऱ्या विश्व युद्धाच्या वेळी दिसले होते. या कंट्रेल्समुळे फायटर पायलट म्हणजे लढाऊ वैमानिकांची सुटका व्हायची.