'बिग बॉस मराठी 4'च्या घरात स्नेहलता वसईकरची वाईल्ड कार्ड एन्ट्री झालीय.
डेंजर झोनमध्ये असलेल्या योगेश जाधवला घरातून बाहेर पडावं लागलं.
स्नेहलताची या पर्वातली पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे.
स्नेहलताच्या एन्ट्रीने बिग बॉसची समिकरणं बदलण्याची शक्यता आहे.
येणारा आठवडा खूप उत्कंठावर्धक असणार आहे.
'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत स्नेहलता दिसली होती.
या मालिकेमुळे स्नेहलता घराघरांत पोहोचली.
स्नेहलता तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे अनेकदा चर्चेत असते.
बोल्ड फोटोशूटमुळे नेटकरी तिला अनेकदा ट्रोल करत असतात.
स्नेहलताच्या एन्ट्रीने बिग बॉसकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.