प्रियांका चोप्रा पहिल्यांदाच आपल्या लेकीसोबत भारतात येत आहे. बोर्डिंग पासचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत तिने माहिती दिली. लग्नानंतर प्रियांका निक जोनससह अमेरिकेत स्थायिक झाली. तीन वर्षानंतर प्रियांका आपल्या लेकीसोबत भारतात येत आहे. या बातमीमुळे तिच्या चाहत्यांना चांगलाच आनंद झाला आहे. प्रियांका आणि निक जोनस यांचे 2008 साली लग्न झालं. त्यांना मालती नावाची गोंडस मुलगी आहे. प्रियांका सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहे. प्रियांकाने लेकीसोबत यंदा दिवाळीचा सण साजरा केला. सेलिब्रेशनचे फोटोदेखील तिने शेअर केले होते.