रात्री लवकर झोपणंही आवश्यक आहे. मात्र, काही लोकांना रात्री लवकर अंथरुणावर पडून सुद्धा झोप लागत नाही. तुम्हालाही रात्री लवकर लवकर झोप लागत नाही? काही सोपे उपाय केल्याने तुम्हांला चांगली झोप लागेल. हे उपाय कोणते जाणून घ्या. काही सोपे उपाय केल्याने तुम्हांला चांगली झोप लागेल. हे उपाय कोणते जाणून घ्या. व्यस्त वेळापत्रकामुळे अनेकांना पुरेशी झोपही मिळत नाही, त्यातच तब्येतीकडे दुर्लक्ष होतं, त्यामुळे अनेक गंभीर आजारांना आमंत्रण मिळतं. झोपेची नियमित वेळ ठरवा. झोपेचे नियमित वेळापत्रक ठरवणे महत्त्वाचे आहे रात्री झोपण्यापूर्वी ध्यान आणि योगासने करा. यामुळे तुम्हाला चांगली झोप मिळू शकते. झोपण्यापूर्वी कोमट पाणी किंवा कोमट दूध प्या. झोपेच्या वेळी आजूबाजूला शांत वातावरण असावं. गोंगाट नसावा. झोपण्याच्या किमान एक तास आधी मोबाईल, टीव्ही आणिइतर डिजिटल उपकरणांपासून दूर राहा. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.