दिवाळीचा सण जवळ आला आहे. या दिवसांमध्ये सुंदर दिसण्याकरता स्त्रिया खूप काही करतात. या सणात सुंदर दिसण्याकरता जाणून घ्या सोप्या स्किन टिप्स. सणासुदीच्या काळात त्वचेला तजेलदार ठेवण्यासाठी त्वचेला हायड्रेट करणं गरजेचं आहे दररोज पुरेशा प्रमाणात पाणी प्यावं. त्वचेशी संबंधित समस्या टाळण्यासाठी तुम्ही रोज सनस्क्रीन वापरू शकता. चमकदार त्वचेसाठी चेहरा स्वच्छ ठेवणे खूप महत्वाचे आहे. दररोज रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा. यासाठी तुम्ही हायड्रेटिंग क्लींजर वापरू शकता. फेस मास्क वापरणे फार गरजेचे आहे.