घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो आणू शकता.
फेस क्लिनिंगच्या प्रक्रियेतील पहिली स्टेप म्हणजे चेहरा पूर्णपणे स्वच्छ करणे. यासाठी हलक्या फेस वॉशचा वापर करा.
चेहरा क्लिन करण्याची पुढची स्टेप म्हणजे स्टीमिंग. स्टीमिंग केल्याने ब्लॅकहेड्स आणि मृत त्वचेच्या पेशी काढून टाकणे सोपे होते.
एका भांड्यात पाणी गरम करा. पाण्याला चांगली उकळी आली की एक मोठा टॉवेल घ्या. आणि गरम पाण्याची वाफ घ्या.
वाफ घेतल्यावर काही वेळ चेहऱ्यावर बर्फाचे तुकडे चेहऱ्यावर लावा. यामुळे सैल त्वचा घट्ट होते.
स्टिमिंग केल्यानंतर चेहरा स्क्रब करावा लागतो. त्वचेच्या मृत पेशी स्क्रबिंगने सहज काढल्या जातात.
यासाठी अर्धा टोमॅटो घ्या. त्यात साखर आणि कॉफी पावडर एकत्र करा आणि टोमॅटोच्या स्लाईसच्या मदतीने हळूवारपणे चेहरा स्क्रब करा.
एक चमचा बेसनामध्ये चिमूटभर हळद मिसळून त्याची पेस्ट दही किंवा गुलाबपाणीच्या मदतीने तयार करा. हा फेस पॅक चेहऱ्यावर 10 ते 15 मिनिटे लावून ठेवा .