निरोगी आरोग्यासाठी शरीराची हालचाल होत राहणं गरजेचं आहे.

व्यायामामुळे शरीराची हालचाल होते आणि निरोगी राहण्यास मदत होते.

हालचाल न करता एका जागी स्थिर बसल्यामुळे अनेक समस्यांना आमंत्रण मिळते.

दिवसभर एका जागी बसण्याचा आरोग्यावर फार वाईट परिणाम होतो.

एका संशोधनानुसार, दिवसभर बसून राहण्याचा शरीरावर खूप वाईट परिणाम होतो.

स्थिर बसून शरीरावर होणारा परिणाम टाळण्यासाठी दर अर्ध्या तासाला शरीराची हालचाल होणे गरजेचं आहे.

यासाठी तुम्ही दर अर्ध्या तासाने किमान पाच मिनिटे चालण्याची सवय करून घ्यावी.

जर्नल मेडिसिन अँड सायन्स इन स्पोर्ट्स अँड एक्सरसाइजमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनाच्या एका अहवालात ही बाब समोर आलीय.

या अहवालानुसार, दर अर्ध्या तासानं चालल्यानं रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते.

वेळोवेळी शरीराची हालचाल केल्यानं शारीरिक आरोग्यावरच नव्हे तर मानसिक आरोग्यावरही चांगला परिणाम होतो.

(Image Source : istockphoto)