थंड हवामानामुळे केसांमधील पाणी शोषून घेतलं जात आणि केस कोरडे होतात. नारळाच्या तेलाचे फायदे सर्वांनाच माहित आहे. नारळाचं तेल आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. याचा त्वचा आणि केसांचे आरोग्य जपण्यासाठी वापर केला जातो. हिवाळ्यात कोरड्या केसांच्या समस्येवर सोपा घरगुती उपाय म्हणजे खोबरेल तेल. कोकोनट ऑईल हेअर मास्क वापरून तुम्ही केसांना मुलायम बनवू शकता. सर्वात आधी तुमचे केस स्प्रे बॉटलमधील पाण्याने किंचिंत ओलसर करून घ्या. खोबरेल तेल कोमट करा. यासाठी डबल बॉयलिंग पद्धत वापरा. एका भांड्यात पाणी गरम करून घ्या. दुसऱ्या वाटीत खोबरेत तेल घेऊन ती वाटीत गरम पाण्याच्या भांड्यात ठेवा. तेल फक्त कोमट करा, उकळवू नका. जास्त कोरडे केस असलेल्या केसांना जास्त तेल वापरा. सर्व केसांना पूर्णपणे तेल लावा. यानंतर शॉवर कऐपने केस कव्हर करा. सुमारे 20 ते 30 मिनिटे तेल केसांमध्ये शोषून घेऊ द्या. जमल्यास केसांना तेल रात्रभरही ठेवू शकता. यानंतर कोमट पाण्याने शॅम्पू वापरून केस धुवा. खोबरेल तेलामुळे केस मुलायम होतील त्यामुळे शक्यतो कंडीशनरचा वापर टाळा.