चांगल्या आरोग्याचा पाया हा उत्कृष्ट पोषणाने ठरतो. शारीरिक व्यायामासह संतुलित आहाराचे सेवनही तितकेच महत्त्वाचे आहे.
प्रतिकारशक्ती कमी होणे, रोग बळावण्याची शक्यता, शारीरिक आणि मानसिक वाढ खुंटणे असा अनेक समस्या चुकीच्या पोषणामुळे होऊ शकतात.
मेंदूचे बिघडलेले कार्य हे बहुतेकदा चयापचय विकार (जसे की लठ्ठपणा) आणि/किंवा चुकीच्या आहार पद्धतींमुळे उद्भवते.
लठ्ठपणा आणि चुकीच्या आहाराचे बौद्धिक आरोग्यावर हानिकारक परिणाम होऊ शकतात म्हणून पोषक आहाराचे सेवन करणे गरजेचे आहे.
गर्भधारणेदरम्यान योग्य पोषक आहाराचे सेवन न केल्याने आणि जन्मानंतरच्या बाळाला पचनासंबंधीत समस्या उद्भवू शकतात आणि मेंदूच्या कार्यावरही त्याचा परिणाम होऊ शकतो.
लहानपणी चरबीयुक्त आणि शर्करायुक्त पेयांचे अतिप्रमाणातील सेवन भविष्यात लठ्ठपणाचे कारण ठरु शकते.
तुमच्या मेंदूच्या आरोग्यावर तुमच्या आहाराचा प्रभाव पडतो.
मेंदू आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या व्यवस्थापनासह अनेक महत्त्वपूर्ण प्रक्रियांसाठी महत्त्वाची भूमिका बजावतो.
आपल्या आहाराचा मेंदूच्या कार्यावर महत्त्वपूर्ण प्रभाव पडत असल्याने आपण पोषक आहाराचे सेवन करावे.