लोकप्रिय रॅपर आणि गायक हनी सिंग आणि वाद हे जुनं समीकरण आहे. अनेकदा वादग्रस्त वक्तव्यामुळेही हनी सिंग चर्चेत असतो. पण आता हनी सिंग त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. हनीचा लग्नाच्या 12 वर्षांनंतर घटस्फोट झाला आहे. पत्नी शालिनी तलवारने त्याच्यावर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. हनी सिंग आणि शालिनी यांच्या घटस्फोटाला दिल्लीच्या कौटुंबिक न्यायालयाने मंजुरी दिली आहे. लग्नाआधी अनेक वर्षे ते एकमेकांना डेट करत होते. हनी सिंग आणि शालिनी तलवार 2011 मध्ये लग्नबंधनात अडकले होते. 2021 मध्ये हनी सिंग आणि शालिनी यांनी घटस्फोटासाठी दिल्लीच्या कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. हनी आणि शालिनी यांच्यात गेल्या अडीच वर्षांपासून घटस्फोटाचा खटला सुरू होता.