अभिनेत्री रश्मिका मंदाना ही सध्या एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आहे.



रश्मिकाचा एक डीपफेक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.



रश्मिकाचा हा व्हिडीओ एडिट करण्यात आला आहे.



हा डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला.



व्हिडिओमध्ये एक महिला काळ्या रंगाचा पोशाख परिधान करून लिफ्टमध्ये शिरताना दिसत आहे.



तथापि, चेहरा रश्मिकासारखा दिसतो अशा प्रकारे मॉर्फ आणि एडिट केला गेला आहे.



हा मूळ व्हिडिओ झारा पटेल या ब्रिटीश-भारतीय असलेल्या महिलेचा आहे.



9 ऑक्टोबर रोजी तिने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला होता.



अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ट्वीट शेअर करुन हा व्हायरल व्हिडीओ क्रिएट करणाऱ्यावर कायदेशीर करवाई करण्यात यावी, अशी मागणी केली



हे केवळ माझ्यासाठीच नाही, प्रत्येकासाठी हे अत्यंत भीतीदायक आहे कारण तंत्रज्ञानाचा असा दुरुपयोग केला जात आहे - रश्मिकाचं ट्वीट