अभिनेत्री रश्मिका मंदाना ही सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
रश्मिकाच्या या डीपफेक व्हायरल व्हिडीओचा ओरिजनल व्हिडीओ झारा पटेल सोशल मीडिया इन्फ्लुएसरवरचा आहे.
झारा पटेलनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन डीपफेक व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे.
झारा पटेलची पोस्ट - डीपफेक व्हिडिओमध्ये माझा कोणताही सहभाग नव्हता आणि जे काही घडत आहे त्यामुळे मी खूप अस्वस्थ झाले आहे.
मला स्त्रिया आणि मुलींच्या भवितव्याची काळजी वाटते आहे. कृपया एक पाऊल मागे टाका आणि तुम्हाला इंटरनेटवर काय दिसते ते एकदा तपासा.
झारा पटेलच्या व्हायरल व्हिडीओमध्ये ती ब्लॅक कलरच्या डीपनेक ड्रेसमध्ये दिसत आहे.
या व्हिडीओवर रश्मिकाचा चेहरा एडिट करुन हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे.
झाराने ९ ऑक्टोबर रोजी हा व्हिडिओ पोस्ट केला होता.
तिच्या इंस्टाग्राम बायोनुसार, ती व्यवसायाने इंजिनियर आहे.
झारा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.