बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर तिच्या गायिकी आणि खाजगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. सारा सोशल मीडियावर सक्रिय असून इन्स्टाग्रामवर ती अनेक फोटो शेअर करत असते. आताच तिने तिच्या मालदीवच्या ट्रिप चे फोटो शेअर केले हे फोटो अतिशय सिंपल असूनही दिलखेचक आहेत. आता तिने शेअर केलेले फोटो हे मालदीव मधील असून तिने तसं कॅप्शनमध्ये सांगितलं आहे. मालदीवच्या पाण्यात एक दिवस - असे तिचे कॅप्शन आहे. आपल्या पार्श्वगायनाच्या बळावर नेहा कक्करने बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने खूप कमी वयात आपल्या गाणं गाण्यास सुरुवात केली होती. तिने ऑक्टोबर 2020 मध्ये पंजाबी गायक रोहनप्रीत सिंह याच्याशी विवाह केला होता. नेहाच्या या फोटोंना चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली असून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.