त्यांच्या निधनाने व्यथित झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळूशिल्पकार रविराज चिपकर यांनी त्यांना अनोख्या पध्दतीने श्रद्धांजली वाहिली आहे. सिंधुताई सपकाळ यांचं वाळूशिल्प वेंगुर्ले तालुक्यातील आरवली सागरतीर्थ समुद्र किनाऱ्यावर साकारून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पाच चार लागून हे वाळूशिल्प सागरतीर्थ समुद्र किनाऱ्यावर त्यांनी साकारलं आहे. यासाठी त्यांना एक टन वाळू लागली. वाळूशिल्प प्रेमींना तसेच सिंधुताईच्या चाहत्यांना हे शिल्प आरवली सागरतीर्थ समुद्र किनाऱ्यावर पहावयास मिळणार आहे. सिंधुताई सपकाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 रोजी वर्धा येथे झाला. सिंधुताई सपकाळांचा जीवनप्रवास आज संपला असला तरी त्यांच्या कार्याचा ठसा मात्र कायम राहणार आहे.