अनाथांची माय अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचं पुण्यातल्या गॅलक्सी रूग्णालयात निधन झालं.



रांगोळी कलाकार अजित औरवाडकर यांनी समाजसेवक, अनाथांची माय पद्माश्री सिंधुताई सपकाळ यांना रांगोळी द्वारे भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली आहे.



सिंधूताईंची रांगोळी काढण्यासाठी अजित औरवाडकर यांना सात तासाचा अवधी लागला



लेक कलारचा वापर करून त्यांनी रांगोळी रेखाटली आहे.



बेळगाव मधील वडगाव येथील आपल्या स्टुडिओत त्यांनी ही रांगोळी काढली आहे.



सदर रांगोळी ज्योती फोटो स्टुडिओ वडगाव येथे पाहता येईल.



दि.6 ते 9 तारखे पर्यंत सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत लोकांना स्टुडिओत रांगोळी पाहता येईल.



सामाजिक अत्याचारांना बळी पडलेल्या सिंधुताईंनी महाराष्ट्रात अनाथाश्रम स्थापन केलेत. त्यांना अन्न, शिक्षण आणि निवारा उपलब्ध करुन दिला.