'खुलता कळी खुलेना' आणि 'तुला पाहते रे' या मालिकांमधून झळकलेली अभिनेत्री म्हणजे अभिज्ञा भावे.

गेल्या वर्षी म्हणजे 6 जानेवारीला अभिज्ञा भावेने मेहूल पै याच्याशी लग्नगाठ बांधली.

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अभिज्ञाने अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.

हे फोटो शेअर करत तिने मेहूलला लग्न वर्षपूर्तीबद्दल शुभेच्छा दिल्यात.

मेहुल आणि अभिज्ञा एकाच कॉलेजमध्ये होते आणि गेल्या पंधरा वर्षांपासून ते एकमेकांना ओळखत होते.

मेहुल आणि अभिज्ञा नेहमी एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.