कुणाला कशाचा छंद असेल, हे सांगता येत नाही.

साधारणत: वाचन, गायन, खेळ, संगीत आदी क्षेत्रातील छंद जोपासणाऱ्या व्यक्ती आपण पाहतो.



परंतु इमारतींच्या प्रतिकृती बनविण्याचा अजब छंद अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील धानोरा म्हाली येथील एका युवकाने जोपासला आहे.

संसद भवन नंतर आता तर राष्ट्रपती भवनाची हुबेहूब प्रतिकृती या युवकाने तयार केली आहे.



अमरावती जिल्ह्याच्या चांदूर रेल्वे तालुक्यातील धानोरा म्हाली येथील अमर मेश्राम या युवकाने

राष्ट्रपती भवनाची प्रतिकृती देशामध्ये आजपर्यंत झालेल्या सर्व राष्ट्रपतींसोबतच भविष्यामध्ये होणाऱ्या राष्ट्रपतींच्या आठवणीमध्ये बनविलेली आहे.



340 खोलीच्या राष्ट्रपती भवनाची प्रतिकृती तयार करण्यासाठी या युवकाला तब्बल 6 महिण्यांचा कालावधी लागला.

विशेष म्हणजे, याला ही चार फ्रंट आहे. त्यामधल्या एका फ्रंटला जास्त महत्व आहे.



ते चारही बाजूने वेगवेगळे असुन याकरिता फाईल शीट, टुथपिक्स आणि प्लायवुड हे साहित्य वापले आहे.

यापुर्वीही या युवकाने संसद भवनाची 144 खांबांची हुबेबूब प्रतिकृती तयार केली होती.



ही इमारत पूर्णपणे गोल आहे. इमारतीचे प्रवेश द्वार वेगवेगळे बनलेले आहे.

याशिवाय विविध इमारतींची प्रतिकृती या युवकाने बनविली आहे.



राष्ट्रपती भवनाच्या प्रतिकृतीमध्ये तेथे असणाऱ्या बारीक- बारीक गोष्टी त्यामध्ये नमुद केल्या आहे.