सावंतवाडीमधील रोणापाल-सोनुर्ली येथील घनदाट जंगलात विदेशी महिला बांधून ठेवलं होतं. 27 जुलै रोजी एक विदेशी महिला साखळदंडाने बांधलेल्या अवस्थेत आढळून आली होती. सोनुर्लीतील काही गुराखी गुरे चारण्यासाठी जंगलात गेले असता त्यांना या महिलेचा आवाज आला, त्यानंतर त्या गुराख्यांनी पोलिसांना माहिती दिली. ललिता कायी कुमार एस असं या महिलेचं नाव आहे. ही महिला अमेरिकन असून सध्या तामिळनाडूमध्ये वास्तव्यास होती. सदर घटनेबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन महिलेची साखळदंडातून सुटका केली होती. ही महिला रोणापालपर्यंत कशी आली, याबाबत पोलीस माहिती गोळा करत आहे. पोलिसांकडून प्राथमिक तपास म्हणून सदर महिलेला काही प्रश्न विचारले. यावेळी ती महिला हे कृत्य पतीकडून केले असं म्हणत होती. महिलेच्या उजव्या पायाला साखळदंड घालून ते एका झाडाच्या बुंध्याला लॉक करण्यात आले होते. तीन दिवस उपाशी राहिल्याने ती महिला बोलण्याच्या स्थितीत नव्हती.