दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवगडमधील कुणकेश्वर मंदिरात 11 हजार 111 हापूस आंब्यांची आरास करण्यात आली.

सिंधुदुर्गच्या कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने कुणकेश्वराच्या चरणी 11,111 आंब्यांची सजावट करण्यात आली.

मंदिराच्या गाभाऱ्यात आणि पिंडी सभोवताली 11 हजार 111 आंब्यांची आकर्षक आरास करण्यात आली.

हापूस आंब्याच्या सुगंधाने मंदिर परिसर दरवळून गेला होता.

कुणकेश्वर, मिठमुंबरी तसेच तालुक्यातील बागायतदारांनी हापूस आंब्याच्या पेट्या श्री देव कुणकेश्वर मंदिरात आरास करण्यासाठी स्वखुशीने दिल्या होत्या.

यावर्षी अवकाळी पाऊस, अति उष्णता यामुळे आंबा पीक कमी आलं आहे.

तरीही बागायतदारांनी कुणकेश्वर मंदिर गाभाऱ्यात शिवलिंगाभोवती सजावट करण्यासाठी देवगड हापूस आंबे दिले.

दरम्यान, कुणकेश्वर चरणी आंब्यांची आरास गेल्या आठ वर्षांपासून केली जात आहे.

कुणकेश्वर मंदिर पांडवकालीन मंदिर आहे. या मंदिराची बांधणी वास्तुकलेचा सुंदर नमुना आहे.