सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्गमधील तिलारी धरणाला तिरंग्याची आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर धरणाला तिरंग्याची आकर्षक अशी विद्युत रोषणाई केली आहे.

तिलारी धरणातून पाण्याचा विसर्ग होत असलेल्या ठिकाणी रोषणाई करण्यात आली आहे.

धरणाच्या सॅडल डॅम इथल्या दरवाजातून विसर्ग होण्याच्या ठिकाणी केशरी, पाढंरा आणि हिरव्या रंगाची रोषणाई केली आहे.

सॅडल डॅम इथे धरणाचे चार दरवाजे आहे. त्यापैकी तीन दरवाजांवर ही रोषणाई करण्यात आली आहे.

रविवारी रात्री तिलारी धरणाला ही रोषणाई केली आली.

पाणी सांडव्यातून वाहत असताना ते तिरंग्याच्या रंगात वाहत असल्याचा भास होत आहे.

अवघा देश उद्या म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे.

या निमित्ताने ठिकठिकाणी तिरंग्याची रोषणाई केल्याचं पाहायला मिळत आहे.

Thanks for Reading. UP NEXT

दोन्ही बाजूंनी पाहता येणारा कोकणातील बाबा धबधबा

View next story