आंबोली-आजरा राज्य मार्गावर गवसेनजीक तब्बल 10 किलो 688 ग्रॅम वजनाची सुमारे 10 कोटी 74 लाख रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त करण्यात आली.

या तस्करी प्रकरणी सिंधुदुर्गच्या कुडाळ येथील पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.



आजरा पोलीस आणि वनविभागाने काल सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास संयुक्तरित्या ही कारवाई केली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आजरा मार्गे व्हेल माशाची उलटीची तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती आजरा पोलिसांना मिळाली होती.

यानंतर आजरा-आंबोली मार्गावर साफळा रचून ही धडक कारवाई करण्यात आली.

यावेळी पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून यात वापरण्यात आलेली एक चारचाकी आणि एक दुचाकीही जप्त करण्यात आली आहे.

व्हेल माशाच्या उलटीला तरंगणारे सोने म्हणतात. त्याची उलटी अॅम्बरग्रीस या नावानेही ओळखली जाते.

व्हेल माशाच्या उलटीचा वापर हा भारतात आणि विदेशात अतिउच्च प्रगतीच्या सुगंधी द्रव्य, परफ्युम बनवण्यासाठी होतो.

व्हेल माशाची उलटी किंवा व्हेल माशाचा कुठलाही भाग जवळ बाळगणे हे वन कायद्यानुसार गुन्हा असून तो शिक्षेस पात्र आहे.

Thanks for Reading. UP NEXT

देवगडमधील कुणकेश्वर मंदिरात 11,111 हापूस आंब्यांची आरास

View next story