कोकण हे महाराष्ट्रातलं खूप सुंदर असं ठिकाण आहे. कोकणातील डोंगर, समुद्र आणि हिरवळीसाठी खास तो ओळखला जातो.

Published by: जगदीश ढोले
Image Source: google

कोकणातील प्रसिद्ध हापूस आंब्यांची तर आपण दरवर्षी आतुरतेने वाट पाहतो.

Image Source: google

कोकणात गणपतीपुळे, गुहागर, मालवण, तारकर्ली असे सुंदर समुद्रकिनारे आहेत.

Image Source: google

कोकणात मासे, भात, सोलकढी, उकडीचे मोदक, आणि घावन यांसारखे पारंपरिक आणि चविष्ट जेवण मिळतं.

Image Source: google

कोकणातील शिमगा आणि गणेशोत्सव पाहण्यासारखा असतो.

Image Source: google

छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले सिंधुदुर्ग , विजयदुर्ग सारखे किल्ले पाहण्यासारखे आहेत.

Image Source: google

कोकणात पारंपरिक गाणी, फुगडी, पोवाडा आणि दशावतार तर पाहण्यासारखा असतोच पण विशेषत: या ठिकाणी केला जाणारा 'बाल्या डान्स' खास असतो.

Image Source: google

कोकणात डोंगर, धबधबे, हिरवळ आणि पक्षी-प्राणी भरपूर आहेत. असं म्हणतात मनाची शांती हवी असेल तर कोकणात जावं.

Image Source: google

कोकणात मातीची घरे, कौलांचे छप्पर, शेणाने सारवलेली घरे असतात. इथल्या मातीचा ओलावा आपल्याला हवाहवासा वाटतो.

Image Source: google

कोकण एकदा पाहिलं की पुन्हा-पुन्हा कोकणात जाण्याची इच्छा होतेच.

Image Source: google