पनीरमध्ये कॅल्शियम आणि हेल्दी फॅट्स मुबलक प्रमाणात आढळतात.

पनीर खाल्ल्याने स्नायूंचा विकास होतो आणि हाडे मजबूत होतात. पण प्रश्न पडतो की आपण जे पनीर खातो ते चांगलं की बनावट आहे?

बाजारातून पनीर विकत घेताना ते आपल्या हातांनी कुस्करून पाहा.

पनीरमध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ असेल तर ते लगेच तुटते.

पनीर सहसा दूध पावडर आणि स्किम्ड पावडरपासून बनवले जाते. या प्रकारचे पनीर तुमच्या पोटासाठी खूप हानिकारक आहे.

सोयाबीन पावडर किंवा मैद्याचं पीठ मिक्स करताच पनीरचा रंग बदलतो. बनावट पनीरचा रंग बदलू शकतो.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पनीर बनवताना युरियाचा वापर केल्यास उकळताना त्याचा रंग लाल होतो. जे शरीरासाठी खूप हानिकारक आहे.

खऱ्या आणि बनावट पनीर मध्ये एक विशेष फरक असा आहे की, खरं पनीर जास्त मऊ असते तर बनावट पनीर घट्ट असते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.