खारीकातील मॅग्नेशियम घटक शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. मधूमेहींसाठी खारीक गुणकारी ठरते.
खारीक हाडांसाठी पोषक असते. पाठीचा कणा व अशक्ततेमुळे कंबर दुखणे वगैरे त्रासांवर खारकेची पूड दुधासह घेणे उपयुक्त असते.
खारीक नियमित खाल्ल्यास हृदयविकार होत नाहीत. शरीरातील रक्ताची कमतरता खारकाच्या सेवनाने दूर होईल.
सर्दीने त्रस्त असाल तर खारीक उकळलेल्या दुधामध्ये विलायची पूड टाकून सेवन करा. सर्दी लवकर बरी होईल.
भूक वाढवण्यासाठी खारीक दुधामध्ये उकळून घ्या.
अर्धांगवायू आणि हृदयविकाराचा त्रास खारकाच्या सेवनाने कमी होईल.
खारीक नियमित खाल्ल्यास दमा असणाऱ्या रुग्णांना आराम मिळेल.
रात्री झोपताना खारीकच्या दुधाचे सेवन केल्यास शरीराला उर्जा प्राप्त होते.
खारकेत भरपूर फायबर, जीवनसत्त्व असून पोटॅशियमही आहे. योग्य प्रकारे वजन वाढण्यासाठी खारकेचा वापर करावा.
वाईट कोलेस्टोरॉल कमी करण्यासाठी, शरीराला लोहाचा पुरवठा करण्यासाठी खारीकचा उपयोग होतो.