आज सरदार वल्लभभाई पटेल (Sardar Vallabhbhai Patel) यांची 148 व्या जयंती (Birth Anniversary) आहे.



यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोहपुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांना अभिवादन केलं.



पंतप्रधान मोदी यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी (Statue of Unity) येथे पुष्पांजली अर्पण केली.



नर्मदा नदीच्या काठावर बांधलेले सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचा पंतप्रधान मोदी यांनी पुष्पांजली अर्पण केली.



सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी यांनी मेरा युवा भारत संघटनेचा शुभारंभ केला.



आज सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंती निमित्त पंतप्रधान मोदी यांनी 'मेरा युवा भारत' संघटना लाँच केली.



पंतप्रधान रविवारी 'मन की बात' कार्यक्रमात सांगितलं होतं की,



'मेरा युवा भारत' संघटना भारतातील तरुणांना विविध राष्ट्र उभारणी कार्यक्रमांमध्ये सक्रिय भूमिका बजावण्याची संधी देईल.



विकसित भारताच्या उभारणीत भारतातील युवाशक्तीला एकत्रित करण्याचा हा अनोखा प्रयत्न आहे.



देशातील तरुणांसाठी 'मेरा युवा भारत' हे महत्त्वाचं व्यासपीठ ठरणार आहे