सकाळी उठल्यावर स्वत: सोबत सकारात्मक बोला, आणि आरशात पाहून एक स्माईल द्या
दिवसभरात व्यायाम नाही करता आला तर रात्री जेवल्यानंतर कमीत कमी 10 मिनिटं तरी चालायला जा
कमीत कमी 7 ते 8 तासाची झोप पूर्ण करा, झोपेची एकच वेळ निश्चित करा
आजुबाजूला असलेल्या लोकांबद्दल आणि वस्तूबद्दल कृतज्ञता व्यक्त करा
इतरांसोबत तुमची तुलना करणं बंद करा
काही गोष्टी विसरा आणि माफ करायला शिका ज्यामुळे तुम्हाला त्रास कमी होईल
तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी दिवसातून एकदा तरी करा, जेणेकरुन तुमचा दिवसभरातील थकवा दूर होईल