बेबी कॉर्नमध्ये अँटिऑक्सिडेंट असतात जे कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध करतात. इतर फळे आणि भाज्यांसोबत शिजवल्याने बेबी कॉर्नमधील अँटिऑक्सिडंट्सच्या प्रमाणात वाढ होते. बेबी कॉर्नच्या सेवनाने आपण कर्करोगासारख्या आजारांपासून दूर राहू शकतो. अॅनिमियाचा त्रास असलेल्या लोकांना बेबी कॉर्नचे सेवन केल्याने फायदा होऊ शकतो. बेबी कॉर्न अॅनिमियाशी लढण्यास मदत करते. बेबी कॉर्नमध्ये मोठ्या प्रमाणात लोह असते जे हिमोग्लोबिन तयार करण्यास मदत करते. बेबी कॉर्नमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी प्रमाणात आहे. त्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांसाठी ते खूप फायदेशीर आहे. बेबी कॉर्नमध्ये असलेले फायबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास देखील उपयुक्त आहे. बेबी कॉर्नमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट आणि व्हिटॅमिन ई असते जे त्वचेशी संबंधित समस्यांवर फायदेशीर आहे. व्हिटॅमिन ई त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. सूचना: डॉक्टर आणि आहार तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक घ्यावा...