अनेकांना काजू आणि बदाम खायला आवडतात. पण तुम्हाला माहित आहे का की, काजू-बदाम जगातील सर्वात महाग ड्राय फ्रूट नाही. जगातील सर्वात महागड्या सुका मेवा कोणता हे जाणून घ्या. पाइन नट्स हे सर्वात महागडं ड्राय फ्रूट आहे. पाइन नट्स अतिशय पौष्टिक ड्रायफ्रूट आहे, याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. पाइन नट्सची चवलाही स्वादिष्ट असतात. पाइन नट्सचे अनेक फायदे आहेत, जे तुमचे आरोग्य सुधारू शकतात. पाइन नट्समध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते. पाइन नट्स कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअमचा उत्तम स्रोत आहेत. यामुळे ह्रदयाचं आरोग्य सुधारते. पाइन नट्समधील प्रोटीनमुळे वजन नियंत्रित ठेवण्यासही मदत होते. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.