झोपण्याआधी 'ही' स्किन केअर टिप्स फॉलो करा अनेक जण सध्या त्वचेसंबंधित विविध समस्यांनी त्रस्त आहेत. पिंपल्स, पोरर्स, काळवंडलेपणा या सारख्या अनेक समस्या पाहायला मिळतात. तुम्ही तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये बदल करून त्वचेसंबंधित समस्यांपासून सुटका मिळवू शकता. तुमची त्वचा निस्तेज झाली असेल, तर तुम्हीही हा उपाय करु शकता. झोपण्याआधी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. मेकअप काढण्यात अनेक वेळा काही जण कंटाळा करतात, पण ही चूक तुम्हाला महागात पडू शकते. चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर चेहऱ्यावर कोणतेही प्रोडक्ट वापरू नका. यामुळे रात्री चेहऱ्याला केमिकलपासून दूर ठेवून ऑक्सिजन मिळेल. तुम्ही 10 दिवस दररोज हे सोपं रुटीन फॉलो केलं तर, तुमच्या त्वचेसंबंधित सर्व समस्या दूर होतील. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.