अचानक हृदयाचा झटका म्हणजे हार्टअटॅक. हार्टअटॅक येण्यामागे अनेक कारणं असू शकतात. पण हृदयाला रक्तपुरवठा सुरळीत न होणं, हृदयाच्या धमण्यांमध्ये दोष निर्माण झाल्यास हार्टअटॅक येऊ शकतो. पण आता तरुणांमध्ये हृदयाच्या झटकाने मृत्यु झालेले बघायला मिळत आहेत. त्यातच आता अचानक हार्टअटॅक येण्याचे प्रमाण वाढत आहे. बदलती जीवनशैली, जेवणाच्या अनियमितवेळा, व्यायामाचा अभाव हे यामागील मुख्य कारण आहेत. कोकेनचं सेवन करणं हे हृदयविकारचा झटका येण्यामागील मुख्य कारण आहे. शरीरात विशिष्ट प्रकारचे बदल होऊ शकतात. ज्यामुळे तरुणांना अचानक आणि लवकर हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. हार्टअटॅक येऊ नये म्हणून पोषक आहार घ्या.