अळशीच्या बिया तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. याच्या सेवनाने अनेक आजारांमध्ये दीर्घकालीन फायदा होतो. त्वचा, केस आणि पचनाची समस्या दूर करण्यास उपयुक्त. वजन कमी करण्यासाठी देखील याचा वापर होतो. अळशी खाल्याने कॉलेस्ट्रोल कमी होते. अळशी खाल्ल्याने मधुमेह आणि रक्तदाबही नियंत्रित राहतो. अळशीच्या बियांमध्ये आढळणारे काही पोषक तत्व जळजळ, पार्किन्सन रोग आणि दमा यांसारख्या आजारांना दूर ठेवतात. हृदयासंबंधी आजार होत नाहीत. अळशीच्या सेवनाने महिलांचा मासिक पाळीचा त्रासही कमी होण्यास मदत होते. सांधेदुखीमध्येही आराम पडतो आणि हाडं मजबूत होण्यास मदत होते.