बरेचजण सांधेदुखीला त्रस्त असतात.

सांधे आखडणं, सांधे कडक होणं, सांध्यांना सूज येणं ही सांधेदुखीची लक्षणं आहेत.

जाणून घ्या घरगुती उपाय...

सांधेदुखीवर काळे तीळ खूप उपयुक्त ठरतात.

पाण्यात भिजत घातलेले काळे तीळ उपाशी पोटी खाल्ल्यास सांधेदुखी कमी होण्यास मदत होते.

सांधेदुखीवर आवळा गुणकारी ठरतो.

वातामुळे सांधेदुखी होत असल्यास एक चमचा आवळ्याचा रस, आल्याचा रस गुळासोबत घ्या.

रोज झोपण्यापूर्वी एक चमचा साजूक तूप आणि सुंठ चूर्ण गरम दुधासोबत नियमित घ्या.

आपल्या आहारात अक्रोड, कोबी, संत्र यांचा समावेश करावा.

अननस आणि द्राक्षाचा रसही उपयुक्त ठरतो.