सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी दरवर्षी होळी मोठ्या थाटामाटात साजरी करतात. मात्र यंदाची होळी दोघांसाठी खास होती. कारण लग्नानंतरची ही त्यांची एकत्र पहिली होळी आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी 7 फेब्रुवारीला लग्न केले होते. लग्नानंतर कियाराने पती सिद्धार्थ आणि बाकीच्या कुटुंबासोबत मस्त होळी खेळली. सिद्धार्थ मल्होत्राने होळीचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात तो आणि कियारा रंग आणि पाण्यात भिजलेले आहेत.