रोज सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

लिंबू पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते हे आपणा सर्वांना माहित आहे.

पण जास्त प्रमाणात लिंबू पाणी प्यायल्याने एखाद्या व्यक्तीला वारंवार लघवीच्या समस्येचा सामना करावा लागतो.

लिंबू पाणी प्यायल्याने अन्न लवकर पचण्यास मदत होते, परंतु हे पेय काही लोकांसाठी हानिकारक असते.

आवश्यकतेपेक्षा जास्त लिंबू पाणी प्यायल्याने मळमळ आणि सूज यांसारखी लक्षणे दिसू शकतात.

जर तुम्ही जास्त प्रमाणात लिंबू पाणी प्याल तर त्यामुळे छातीत जळजळ होऊ शकते.

लिंबू पाणी जास्त प्रमाणात प्यायल्याने दातांच्या समस्या वाढू शकतात.

तुमच्या त्वचेच्या निगा राखण्याच्या दिनचर्येत लिंबाचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो, परंतु ते थेट त्वचेवर लावल्याने जळजळ होऊ शकते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.